गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गवळीची प्रकृती बरोबर नव्हती. याबाबत तुरुंग अधिकाऱ्यास माहिती सांगण्यात आली होती. त्यानंतर गवळी व इतर कैद्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुरुंग प्रशासनाने या सर्वांना स्वतंत्र बॅरेकमध्ये ठेवले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात 2012 साली गवळीसह 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.