चौरागढ महादेव दर्शनासाठी निघालेल्या 3 भाविकांचा कार अपघातात मृत्यू , एक जखमी

सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (14:52 IST)
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. रामपूर-सारणी रस्त्यावर दमुआजवळ हा अपघात झाला. झिरीघाटाजवळील सुरक्षा भिंतीला तरुणांची कार धडकली. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरश: चुरडा झाला.
 
नागपूरच्या वर्धा जिल्ह्यातील चार तरुण  चौरागढ महादेव मेळ्याला भेट देण्यासाठी जात होते . सोमवारी सकाळी 4 ते 6 च्या दरम्यान हे लोक दमुआ येथून रामपूर तांसी रस्त्यावरून निघाले. येथे दमुआच्या सात किमी पुढे शंकर मंदिराजवळील वळणावर बांधलेल्या सुरक्षा भिंतीला कार धडकली. या अपघातात तुषार नयनेश्वर झामडे (24) किणी आष्टी जिल्हा वर्धा, अक्षय प्रदीप धोखडे (26) तिवसा अमरावती आणि दीपक भावरावजी डाखोडे (25) आष्टी जिल्हा वर्धा या तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर चौथा तरुण अक्षय देविदास कुडापे (17)किणी आष्टी जिल्हा वर्धा हा गंभीररित्या जखमी झाला.
 
 कार वेगाने धावत होती. कार तुषार चालवत होता. वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याला काही समजले नाही आणि कार थेट सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच दमुआ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आणि जखमी अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दमुआ टीआय दीपक बावरिया यांनी सांगितले की, कार चालवताना तुषार हा दारूच्या नशेत होता, त्यामुळे हा अपघात झाला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती