समर्थ रामदासांविना शिवाजी महाराजांना कोणी विचारले असतं, राज्यपालांचे वादग्रस्त विधान

सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (08:56 IST)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समर्थ रामदासां विना छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारेल असतं, अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे. औरंगाबादेत श्री समर्थ साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती.  या विधानानंतर कोश्यारी यांनी मी छत्रपती शिवाजी आणि चंद्रगुप्तला छोट लेखत नसल्याचीही सारवासारव केली होते.
 
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले आहेत की, प्रत्येकामागे त्यांच्या त्यांच्या आई-बाबाचे योगदान आहे. तसेच आपल्या समाजात गूरूंचे मोठे योगदान आहे. तसेच चाणक्य आणि समर्थ रामदास यांचे होते. आजच्या युगात गूरू नाहीत तर गुरूघंटाळ आहेत, असेही ते म्हणाले आहेत.आणि मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी मोठे योगदान दिले असल्याचे कोश्यारी यांनी सांगितले.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याबाबतच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रस्तावास पुणे महानगरपालिकेचे महापौर तसेच हडपसरच्या प्रभाग क्रमांक २३ मधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या विरोधाचा निषेध करण्यासाठी आज  पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती