विदर्भातील कौंडण्यपूरच्या रूपाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील अंबिकापूरला पर्यटन क्षेत्राला शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. विदर्भाचे दैवत माता रुक्मिणीच्या कार्याचा परिचय कायम आपल्या स्मरणात रहावा, यासाठी रुक्मिणी विदर्भ पिठाची स्थापना करण्यात आली आहे. या परिसरात माता रुक्मिणीच्या मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. या पावन कार्यात भरीव योगदान देऊ, असा विश्वास पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी दिला.अंबिकापूर येथील परिसरात माता रुक्मिणीच्या मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
माता रुक्मिणीच्या मंदिराची उभारणी पिठातर्फे करण्यात येणार असून पहिल्या टप्यात 24 कोटी रुपयांचे कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत. मंदिराच्या निर्मितीसह आजूबाजूचा परिसराचे सौंदर्यीकरण,भाविकांसाठी सोयी सुविधा, सभागृहे, आदींची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संबंधितांनी दिली.