जगदीश भीमराव मोतिराळे(42) रा.मामलदे ता.चोपडा हे आपल्या पत्नी उज्ज्वला जगदीश मोतिराळे (32) मुलगा बावीन जगदीश मोतिराळे(10) आणि मुलगी नेहा जगदीश मोतिराळे यांना घेऊन दुचाकी वरून जात असताना चोपडा अमळनेर रस्त्यावर सरकीने भरलेला आयशर यांचा दुचाकीवर पालटला. त्या खाली दाबले जाऊन जगदीश यांनी पत्नी उज्ज्वला आणि मुलगी नेहा या दोघी ठार झाल्या. तर जगदीश आणि मुलगा बावीन हे दोघे जखमी झाले. यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.