अमरावती : कारमध्ये सापडल्या 1200 जिलेटिन कांड्या

मंगळवार, 6 एप्रिल 2021 (09:42 IST)
अमरावतीमध्ये ATS ने नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1200 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या. या प्रकरणात 2 आरोपींना अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद विरोधी पथकाच्या सेलने गुप्त माहितीच्या आधारे स्फोटक वाहनांमध्ये भरून नेत असताना ही कारवाई केली. एटीएसने कानसिंह राणावत आणि सुरज बैस या 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 1200 जिलेटीन कांड्या, एक कार व दोन मोबाईल जप्त केले आहे. दोन्ही आरोपी नांदगाव पेठ परिसरातील रहिवासी आहे.
 
पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहे. ही स्फोटके नेमकी कशासाठी आणली गेली, कुणाच्या मालकीची आहे याची चौकशी केली जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती