Ramrakshastotra Path: चैत्र नवरात्र शुक्ल पक्षातील प्रतिपदेला येते. हिंदू पंचागानुसार पहिला महिना चैत्र म्हणून ओळखला जातो. चैत्र नवरात्रीचा नववा दिवस रामनवमी म्हणूनही ओळखला जातो. २०२5 मध्ये राम नवमी ६ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी राम रक्षास्तोत्राचे विशेष महत्त्व मानले जाते. राम रक्षा स्तोत्राचे महत्त्व जाणून घेऊया.
रामराक्षस्त्रोताचे महत्त्व
राम रक्षा स्तोत्र हे एक संरक्षक कवच आहे. हे रक्षासूत्र पाठ केल्याने खूप फायदे होतात आणि त्याचे परिणाम लवकर मिळतात. हे पठण केल्याने व्यक्ती भीतीपासून मुक्त होते. दररोज याचे पठण केल्याने सर्व त्रास दूर होतात. जो दररोज याचे पठण करतो तो दीर्घायुषी, आनंदी, संततीने धन्य, विजयी आणि नम्र होतो. त्याच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीभोवती एक संरक्षक कवच तयार होते, ज्यामुळे त्याचे सर्व प्रकारच्या आपत्तींपासून संरक्षण होते. असे म्हटले जाते की हे पठण केल्याने भगवान रामासह पवनपुत्र हनुमान देखील प्रसन्न होतात. एक विशेष गोष्ट म्हणजे हे पठण दररोज करावे.
रामरक्षा स्तोत्र पाठ विधी
रामरक्षा स्तोत्र पाठ करण्यासाठी सकाळी अंघोळ करुन स्वच्छ वस्त्र धारण करुन पूजा घर शुद्ध करुन घ्यावे. नंतर सर्व साहित्य एकत्र करुन आसनावर बसावे. चौरंग किंवा लाकडी पाटावर लाल कपडा पसरुन घ्यावा. त्यावर श्रीरामाची मूर्ती अगर तसबीर स्थापित करावी. शक्य असल्यास श्रीराम दरबारचा फोटो असावा. नंतर गणेशजींचा आवाहन करावे. नंतर राम रक्षा स्तोत्र पाठ करावे. नंतर आरती करुन प्रसाद वाटप करावा.