पुण्यात पाण्याच्या वादा वरून तरुणाची हत्या, आरोपीला अटक

बुधवार, 12 जून 2024 (09:34 IST)
पाणी पिण्यासाठी मागितल्यावरून किरकोळ  वाद होऊन एका तरुणाच्या डोक्यात  वीट, सिमेंटचा गट्टू  मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील मुंढवा कामगार मैदानाजवळ घडली आहे. श्रीकांत निवृत्ती आल्हाट असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.राकेश तुकाराम गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मयत श्रीकांत हा आरोपीचा नातेवाईक असून शेजारी एकटा रहायचा. श्रीकांत मोलमजुरी करत होता शनिवारी 8 मे रोजी रात्री तो मद्यपान करून घरी आला आणि त्याने राकेश गायकवाड कडे पिण्यासाठी पाणी मागितले राकेशने त्याला पाणी देण्यास नकार दिले. या वरून दोघात वाद झाले. हळू हळू वाद विकोपाला गेले आणि राकेशने श्रीकांतच्या डोक्यात वीट, सिमेंटचा गट्टू मारला. या मुळे श्रीकांतच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 

स्थानिकांनी सदर घटनेची माहिती मुंढवा पोलिसांना दिल्यावर त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतले संतोष आल्हाट यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी राकेशवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती