आई-बाबांजवळ सतत तक्रार करते म्हणून,14 वर्षाच्या भावाने केली आपल्या 8 वर्षीय बहिणीची हत्या

शुक्रवार, 7 जून 2024 (14:50 IST)
बागपत मध्ये 14 वर्षाच्या भावाने आपल्या 8 वर्षीय बहिणीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावर मिळाला. पोलसांनी 24 तासांच्या आत या घटनेचा छडा लावला. 
 
उत्तर प्रदेश मधील बागपत मध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. जिथे 14 वर्षाच्या लहान मुलाने आपल्या लहान बहिणीची हत्या केली आहे. तिच्या मृतदेह घरापासून काही अंतरावर आढळला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही छोटी मुल्गी नेहमी आपला भाऊ खोड्या करतो म्हणून तिच्या आई वडिलांना सांगायची. ज्यमुळे नेहमी आई वडील त्याला रागवायचे. डोक्यात राग घालून या 14 वर्षीय मुलाने अखेरीस 8 वर्षीय आपल्या बहिणीचा गळाला फास देऊन तिची हत्या केली. 
 
पोलिसांनी त्या मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, लहान बहीण नेहमी त्याची खोटी तक्रार आई वडिलांजवळ करायची ज्यामुळे त्याला हे पालक रागवायचे कधी मारायचे देखील. यामुळे त्याला खूप राग यायचा. अखेरीस त्याने हे टोकाचे पाऊल उचललेले. व ओढणीने तिचा गळा आवळून हत्या केली. व तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावर टाकून आला. पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत या घटनेचा छडा लावला. व अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती