जबलपुरातील सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन अंतर्गत मिलेनियम कॉलनीत राहणारा एक रेल्वे कर्मचारी आणि त्याच्या आठ वर्षांच्या मुलाची शेजारी राहणाऱ्या तरुणाने हत्या केली. रेफ्रिजरेटरमध्ये एका निष्पाप मुलाचा मृतदेह पोलिसांना सापडला. आरोपी तरुण त्याच्या अल्पवयीन मुलीसह फरार झाला.मध्य प्रदेशात या दुहेरी हत्येमुळे खळबळ उडाली आहे.
सदर घटना जबलपुरातील मिलेनियम कॉलोनीत राहणाऱ्या एका रेल्वे कर्मचारी आणि त्याच्या ८ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येननंतर आरोपींनी मुलाचा मृतदेह फ्रिज मध्ये ठेवला होता. या घटनेनेनंतर मयताची १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. नातेवाईकांना मुलीच्या मोबाईलवरून हत्या केल्याचाही माहिती देणारा व्हॉइस मेसेज पाठविण्यात आला होता. या नंतर या घटनेचा उलघडा झाला.
मयताचे नाव राजकुमार विश्वकर्मा असून ते रेल्वे मध्ये अधीक्षक पदावर कार्यरत होते, त्यांच्या पत्नीचं मे 2023 मध्ये आजारपणामुळे निधन झाले आहे. ते सिव्हिल लाईन्सच्या मिलेनियम कॉलोनीत आपल्या मुला आणि मुलीसह राहायचे.