‘लोकायत’च्या अलका जोशी यांच्यासह चौघांवर FIR

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (08:38 IST)
पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर असलेल्या समाजविद्या ग्रंथालयामध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी लोकायतच्या अलका जोशी यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी अमित अरुण नारकर (वय ४४, रा. प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अल्का जोशी, मंगल पाईकवार, सतीश पाईकवार, विशाल बागूल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉ कॉलेज रस्त्यावर समाजविद्या ग्रंथालय आहे. ही जागा नारकर यांच्या मालकीची आहे. त्या ठिकाणी जोशी व इतरांनी अनाधिकृतरित्या प्रवेश केला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी फिर्यादी व इतरांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

संबंधित माहिती

पुढील लेख