मोदीखान्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून केली होती 63 जणांवर कारवाई

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (08:36 IST)
पुणे लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहरातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने कारवाई केल्यानंतर आता ही कारवाई ‘संयुक्त’ दाखवा किंवा त्यात ‘जास्त मोठी’ कारवाई दाखवू नका म्हणणाऱ्या तसेच हद्दीतील ‘अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून लष्कराच्या पोलीसाचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश धर्मा सोनवणे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
 
गेल्या आठवड्यात (दि 28 जानेवारी) गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक व युनिट दोनच्या पथकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीवरून लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 मजली इमारतीत दणक्यात सुरू असलेल्या जुगार आड्यावर छापा टाकला. या छापा कारवाईत जवळपास पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज पकडला. तर सर्वाधिक म्हणजे सागर खरे याच्यासह 62 जणांना इमारतीत पकडण्यात आले. ही कारवाई झाल्यानंतर मात्र शहरात एकच खळबळ उडाली होती.
 
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर ही कारवाई गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तितक्याच दणक्यात केली. पण ‘गंमत’ अशी झाली कारवाईला अधिकारी शिरले आत पण जुगार चालक सागर खरेने इमारतीचा दरवाजा मात्र काही उघडला नाही. अधिकारी हैराण झाले. मग राजेश तिथे आले. त्यांनी आवाज देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यानंतर हा दरवाजा लागलीच उघडला आणि कारवाईला सुरुवात झाली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती