हा सर्व प्रकार ऑगस्ट महिन्यात घडलेला असून, आता तो समोर आला आहे. ऑगस्टमध्ये पिडित मुलीचे आई-वडिल दोन्ही मुलांना घरी ठेवून कामानिमित्त बाहेर गेले असताना बारा वर्षीय मुलाने मोबाईलवर पाहिलेल्या व्हिडिओप्रमाणे आपल्याच बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. मात्र याबाबत घरच्यांना काहीच कल्पना नव्हती. गुरुवारी जेव्हा मुलीला त्रास होऊ लागला तेव्हा तिला वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तपासणी केल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.
तेव्हा पालकांनी मुलीला विश्वास घेऊन विचारपूस केल्यावर तिच्यासोबत हे कृत्य भावाने केले असल्याचे तिने सांगितले. अभ्यास करत असताना युट्युबवरील अश्लील व्हिडिओ पाहूनच हे अश्लील कृत्य केल्याची कबुली मुलाने आपल्या आई-वडिलांना दिली. या प्रकारानंतर पिंपरीतील सरकारी रुग्णालयाच्या मार्फत भोसरी पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाली.