35 वर्षीय मृत तरुण हा अविवाहित होता. तर महिला ही विवाहित होती. या विवाहितेचं या तरुणासह गेल्या 2 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. या विवाहतेचा पती हा खून प्रकरणात 4 वर्षांपासून कारावास भोगत आहे. विवाहित महिला ही या तरुणाच्या प्रेमात होती. दोघांमध्येही 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही नेहमीच दिघीतील एका ठरलेल्या लॉजमध्ये भेटायचे. अशाच प्रकार ठरल्यानुसार 24 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता भेटले. दोघेही लॉजमधील रुममध्ये आले. या दरम्यान दोघांमध्ये कोणत्या तरी मुद्द्यावरुन कडाक्याचा भांडण झालं. या वादावादीतून या तरुणाने विवाहित प्रेयसीचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने गळफास आत्महत्या केली.