corona New varient : नवा व्हेरियंट मिळाल्यावर भारतात अलर्ट, राज्यात निर्बंध लागू शकतात ?

शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (14:43 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे व्हरतात आणि राज्यात सर्वत्र कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. राज्यात देखील शाळा महाविद्यालय, मंदिर, नाट्यगृह, चित्रपटगृहे सुरु करण्यात आले आहे. राज्यात सध्या इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची  शाळा सुरु करण्यात आली आहे. आता येत्या 1तारखे पासून प्राथमिक शाळाच इयत्ता पहिली ते चवथी पर्यन्तच्या शाळा सुरु होणार आहे. मात्र आता कोरोनाच्या एका नव्या व्हेरियंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. तसेच या मुळे भारत सरकार अलर्ट वर आहे. भारत सरकारने या व्हेरियंट साठी राज्यांना काही सूचना दिल्या आहेत. सध्या युरोपीय देशात कोरोनाच्या या व्हेरियंटचा उद्रेक वाढत आहे. केंद्र सरकार ने राज्य सरकारला दक्षिण आफ्रिका, हॉंगकॉंग आणि बोक्सवान या देशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरियंट ज्याचे नाव ओमिक्रोन असे आहे. याने चिंता वाढवली आहे .या मुळे राज्यात निर्बंध लागणार का? अशा प्रश्नांचे उत्तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले. उपमुख्यमंत्री यांनी आज पुण्यात विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. त्या नंतर त्यांनी पत्रकार परिषद  घेतली. त्यात त्यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावले जाणार आहे का ? असे विचारल्यावर ते म्हणाले  की सध्या पुण्यात काहीच धोका नाही परंतु हा व्हेरियंट इतर ठिकाणी वेगाने पसरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतील. नंतर काही निर्णय घेण्यात येतील. 
आता नाताळचा सण जवळ आला आहे. त्यामुळे बरेच लोक परदेशातून देशात येतील. या बाबत केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली सांगितले आहे. त्या मध्ये बाहेर वरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत ट्रेकिंग आणि टेस्टिंग करणे आवश्यक आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती