प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पुण्यातील एका रुग्णालयाने पूजा खेडकरला सात टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. ता पुन्हा एकदा रुग्णालयाच्या प्रमाणपत्राबाबत अंतर्गत चौकशी करण्यात आली आहे. प्रमाणपत्राची कागदपत्रे नियमानुसार सादर केल्याचे रुग्णालयातील एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणाले की, प्रमाणपत्र देताना कोणताही हलगर्जीपणा झाला नाही
जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने रुग्णालयाला नोटीस पाठवली होती.नोटीसमध्ये पूजा खेडकर यांना दिलेल्या प्रमाणपत्राची अंतर्गत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रमाणपत्र देताना निष्काळजीपणा आढळून आल्यास पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
या वर रुग्णालयातून उत्तर आले गेल्या आठवड्यात आम्हाला पुणे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने नोटीस बजावली होती. यानंतर आम्ही रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी विभागाची अंतर्गत तपासणी केली. सात टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र नियमानुसार दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ते पुढे म्हणाले की, या प्रमाणपत्रामुळे शिक्षण किंवा नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा मिळण्यास मदत होणार नाही.आमच्या तपासणीत कोणालाही कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणासाठी दोषी आढळले नाही.'