पूजा खेडकर ने आई वडील विभक्त होण्याचा दावा केला, केंद्र सरकारने पुणे पोलिसांकडून माहिती मागवली

बुधवार, 24 जुलै 2024 (15:34 IST)
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ होत आहे. तिने पालक विभक्त असल्याचे सांगत क्रिमी लेअरचा फायदा मिळवला असून आता केंद्र सरकारने पुणे पोलिसांकडून तिच्या पालकांच्या वैवाहिक जीवनाच्या स्थितीची माहिती मागवली आहे. 

पूजाने आई वडील मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे वेगळे झाल्याचा खोटा दावा करत UPSC परीक्षेत इतर मागासवर्गीय (OBC) नॉन-क्रिमी लेयर कोट्याचा लाभ मिळवला. तिचा हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. 
 
नियमांनुसार, ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तेच लोक OBC नॉन-क्रिमी लेयरच्या श्रेणीत येतात. पूजाने केलेल्या दाव्यानुसार, तिचे आईवडील वेगळे झाले असून ती आईसोबत राहत होती. तिचे वडील क्लासवन अधिकारी होते. पूजाचा हा दावा खोटा ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. मुळेच केंद्र सरकारने पुणे पोलिसांना पूजा खेडकरच्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन आणि स्थिती याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच पूजा खेडकर यांना बनावट अपंगत्वचे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरासह मदत करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पंग कल्याण विभागाच्या आयुक्तांनी दिले आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती