मुळशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपलं नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. 28 नोव्हेंबर 2014 रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित “महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2014” झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदकं व किताब मिळवले आहेत.
झारखंडच्या रांची मध्ये त्यांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझ पदक पटकावले होते. त्यांनी मुळशीतल्या माले केसरी स्पर्धेचा विजेता बनवून माले केसरी किताब व गदा मिळवली होती. अशा अनेक नामांकित कुस्ती स्पर्धेत माण गावचे आणि मुळशी तालुक्याचे नाव विक्रम पारखी याने उंचावले होते.हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे यांच्याशी त्याचे गुरू-शिष्याचे नाते होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी 1999 कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. विक्रम याच्यामागे आई, वडील, एक विवाहित भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.