पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश सुनील घाटे17 असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी यश हा कॉलेजला जाण्यासाठी घरून निघाला असताना वाटेत दोन मुलांनी त्याला अडवून धारदार चाकूने वार करून यशची हत्या करण्यात आली. भरदिवसा झालेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात यशचा भाऊ प्रज्वल सुनील घाटे याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 18 वर्षीय साहिल लतीफ शेख आणि ताहिर खलील पठाण यांना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हत्या करून साहिल आणि ताहिर फरार झाले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. याप्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहे.