पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे सध्या बराच गदारोळ होत आहे. सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक आंदोलन केले जात आहे. पुण्यात सध्या त्यांच्यावर शाईफेक प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. पुण्यात अशांतता आणि अस्थिरता वाढत असताना त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. तसेच कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई मागे घेण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
ते म्हणाले जय महाराष्ट्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्या भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीला मी वंदन करत आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण आहे. त्यांच्या महान कार्याविषयी त्यांचे मी मनापासून आदर करतो. माझ्या बोली आणि भाषेतून कोणालाही दुखवायचं हेतू नाही. मी त्याच्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि केली आहे. या गोष्टी वरून महाराष्ट्रात अशांतता होऊ नये. अशी माझी इच्छा आहे. माझ्याकडून कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागतो. माझी कोणाविषयी तक्रार नाही. ज्यांना कायदेशीर अटक केली आहे त्यांची मुक्तता करावी तसेच ज्या पोलिसांवर आणि पिलास अधिकाऱ्यांवर निलंबनाची करावी केली आहे. ती माघारी घयावी अशी सूचना देण्यात येत आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली आहे मला त्यांच्या बद्दल काहीही विधान करायचे नाही. आता हा वाद इथेच संपवावा आणि मला कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागत आहे.