देशातील ७५ अग्रणी डॉक्टरांमध्ये डॉ. के. एच. संचेती यांचा समावेश

बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (09:10 IST)
पुणे देशातील वैद्यकीय क्षेत्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ७५ व्यक्तींमध्ये संचेती रुग्णालयाचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती यांचा समावेश करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. संचेती आणि ७४ दिग्गजांचा सन्मान करण्यात आला.

‘हील फाउंडेशन’तर्फे तयार करण्यात आलेल्या एका विशेष कॉफी टेबल बुकसाठी देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या ७५ प्रमुख व्यक्तींची निवड करण्यात आली असून वैद्यक क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. डॉ. के. एच. संचेती यांनी १९६५ मध्ये अस्थिरोग क्षेत्रात वैद्यकीय सेवेस सुरुवात केली. त्यानंतर अविरतपणे तब्बल ५५ हजार शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या आहेत. त्यांच्या या वैद्यकीय सेवेसाठी भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या सन्मानाबाबत डॉ. संचेती म्हणाले,की देशातील वैद्यक क्षेत्रातील दिग्गजांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती