पुणे शहरातील कोरोनाचा आलेख उतरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात एक हजाराच्या खाली कोरोनाबाधित सापडत आहेत. रविवारी शहरातील 840 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून तब्बल 63 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 949 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील 40 आणि पुण्याबाहेरील 23 जणांचा समावेश आहे.