पुण्यात पोलीस भरती परिक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, 2744 हजार जणांचा फौजफाटा तैनात

शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:07 IST)
पुणे पोलीस आयुक्तालयातील  रिक्त 214 शिपाई पदासाठी येत्या 5 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे. पुण्यातील 79 परीक्षा केंद्रावर पोलीस शिपाई पदासाठीची परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तब्बल 2744 पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
 
पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलीस शिपाई पदासाठी  2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. परंतु देशात आणि राज्यात कोरोनाचाप्रादुर्भाव वाढल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आहे. त्यानुसार 214 रिक्त जागांसाठी तब्बल 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा  ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाची लेखी परीक्षा जी.एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत  घेतली जात आहे.
 
असा आहे बंदोबस्त
अपर पोलीस आयुक्त -2, पोलीस उपायुक्त (DCP)-8, सहायक पोलीस आयुक्त (ACP) -13, पोलीस निरीक्षक (PI) – 76, एपीआय (API) – 87, पीएसआय (PSI) 80, पोलीस कर्मचारी (police personnel)- 2 हजार 478
 
पोलिसांकडून उमेदवारांना सूचना
– परीक्षेत मोबाईल वापरता येणार नाही
– कोवीडच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
– परीक्षा झाल्यानंतर पर्यवेक्षकांच्या सूचनेनंतर जागा सोडावी.
– परीक्षेला येताना हॉल तिकीटासह, आधार, पॅन, लायसन्स, पासपोर्ट जवळ बाळगावा
– उमेदवारांनी निळे आणि काळ्या बॉलपेनचा वापर करावा
– परीक्षा संपल्यानंतर प्रवेशपत्र पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागेल.
हॉल तिकीट कसे डाऊनलोड करायचे
परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर हॉल तिकीटची लिंक पाठवली जाणार आहे. काही अडचण आली तर 9699792230, 8999783728, 020-26122880 या क्रमांकावर संपर्क साधावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती