सोसायटीच्या CCTV कॅमेर्‍याचा ‘अ‍ॅगल’ महिलेच्या बेडरूमच्या खिडकीवर, चेअरमन, सेक्रटरी, खजिनदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (15:27 IST)
सोसायटीतील तळमजल्यावर राहणार्‍या महिलेच्या बेडरुमच्या खिडकीत सोसायटीचे CCTV कॅमेरा लावून बेडरुममध्ये काय चालले आहे हे तब्बल एक महिनाभर तिघे जण पहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी या सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदार यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा  दाखल केला आहे.
 
हा प्रकार हिंजवडी-वाकड रोडवरील  एका सोसायटीत ५ ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही महिला सोसायटीत तळमजल्यावर राहते.फिर्यादी यांना माहिती होऊ न देता त्यांच्या परवानगीशिवाय त्या रहात असलेल्या फ्लॅटच्या बेडरुमच्या खिडकीकडे तोंड करुन बेडरुममध्ये काय चालले आहे हे पाहण्याच्या उद्देशाने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसविला.
 
त्याद्वारे फिर्यादी या बेडरुममध्ये प्रायव्हेट कपड्यांवर वावरत असताना त्याचे या पदाधिकार्‍यांनी चित्रिकरण करुन ते त्यांनी पाहिले आहे. त्यानंतर फिर्यादी यांना या कॅमेर्‍याबाबत समजल्यावर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास सांगितला.त्याला पदाधिकार्‍यांनी नकार दिला. फिर्यादी यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे ५ ते २८ सप्टेंबर दरम्यान पाळत ठेवून त्यांचे खासगी कपड्यातील चित्रीकरण केले.म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दहिफळे तपास करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती