उत्तर प्रदेशातील महिला शहजादी खान हिच्या फाशीच्या शिक्षेला युएईमध्ये पुष्टी मिळाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान परराष्ट्र मंत्रालयानेच याची पुष्टी केली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने न्यायालयाला सांगितले की, शहजादी खानला 15 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली.
केंद्र सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात म्हटले आहे की, आता उत्तर प्रदेशातील शहजादी खान यांचे अंतिम संस्कार 5 मार्च रोजी केले जातील. अबू धाबीमध्ये 4 महिन्यांच्या बाळाच्या कथित हत्येप्रकरणी शहजादी खानला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
परराष्ट्र मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला उत्तर देताना म्हटले आहे की, युएईमधील भारतीय दूतावासाला 28 फेब्रुवारी रोजी कळवण्यात आले होते की शहजादीला मृत्युदंडाची शिक्षा युएईच्या कायदे आणि नियमांनुसार देण्यात आली आहे. यावर न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले
10फेब्रुवारी 2023 रोजी अबू धाबी पोलिसांनी शहजादीला तुरुंगात टाकले आणि 31 जुलै 2023 रोजी तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.