मिळालेल्या माहितीनुसार उद्योग भवन आयईडी स्फोटाने उडवून देण्याची धमकीचा मेल मिळाल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीआयएसएफला योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धमकी मिळाल्यानंतर परिसरातील इमारतींच्या प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. पोलिस आणि सीआयएसएफ पथक घटनास्थळी पोहोचले. श्वान पथकाच्या मदतीने उद्योग भवनात शोध मोहीम सुरू आहे.