Prime Minister Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना झाले आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्यात भारत आणि आखाती देशांमधील संरक्षण आणि व्यापार यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची अपेक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी कुवेतच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा करतील, भारतीय कामगार शिबिराला भेट देतील, भारतीय समुदायाला संबोधित करतील आणि गल्फ कप फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. 43 वर्षात भारतीय पंतप्रधानांची आखाती देशाची ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधानांच्या भेटीच्या एक दिवस आधी, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कुवेतसोबत द्विपक्षीय गुंतवणूक करार आणि संरक्षण सहकार्य करारावर चर्चा सुरू आहे.
तसेच विदेश मंत्रालयचे सचिव अरुण कुमार चटर्जी म्हणाले की, "पंतप्रधानांच्या ऐतिहासिक भेटीमुळे भारत-कुवैत द्विपक्षीय संबंधांमध्ये नवा अध्याय सुरू होण्याची अपेक्षा आहे. "यामुळे केवळ विद्यमान क्षेत्रातील भागीदारी मजबूत होणार नाही, तर भविष्यातील सहकार्यासाठी नवीन दरवाजे देखील उघडतील.