लवकरच मोबाईलचे १० आकडे इतिहासजमा, ट्रायने दिला प्रस्ताव

Webdunia
शनिवार, 30 मे 2020 (09:54 IST)
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने एक प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये मोबाईलचे ११ आकडे असावेत असे म्हटले आहे. यानुसार सध्याच्या ग्राहकांना ११ अंकांचा नंबर घ्यावा लागणार आहे.

यामुळे आतापेक्षा जास्त मोबाईल क्रमांक उपलब्ध होऊ शकणार आहेत. जर मोबाईल नंबरचा पहिला क्रमांक ९ ठेवण्यात आला तर १० वरून ११ आकड्यांवर जाण्याने देशात एकूण १००० कोटी नंबरची क्षमता निर्माण होणार आहे. ट्रायने सांगितले की, ७० टक्के वापर आणि सध्याच्या योजनेनुसार देशात ७०० कोटी कनेक्शन उपलब्ध होण्यासाठी हे पुरेसे असणार आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख