एकाच दिवसात झालेली 'ही' कोरोनाबाधितांची सर्वात मोठी वाढ

शुक्रवार, 29 मे 2020 (15:13 IST)
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ७,४६६ नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात १७५ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १,६५,७९९ इतका झाला आहे. 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या ८९,९८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ७१, १०५  रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे देशभरात ४,७०६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत भारताने आता चीनला मागे टाकले आहे. 
देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ५९,५४६ इतके रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू १९,३७२, गुजरात १५,५६२ आणि दिल्लीत कोरोनाचे १६,२८१ रुग्ण आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती