खरगे यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, "आरटीआयने उघड केले आहे की मोदी सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेत ४५५ कोटी रुपयांचा कोणताही मागमूस नाही. काँग्रेसचे म्हणणे आहे की मंत्रालयाकडे ४५५ कोटी रुपयांच्या खर्चाचा कोणताही हिशेब नाही. ही रक्कम कुठे खर्च झाली हे सरकारला माहितीही नाही, असा आरोप पक्षाने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना खरगे म्हणाले की, ज्या योजनेचे कौतुक स्वतः पंतप्रधान कधीही थकत नाहीत, त्या योजनेतील एवढी मोठी अनियमितता गंभीर प्रश्न उपस्थित करते.