हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्राच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 (15:50 IST)
facebook harshavrdhan sakpal
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. ते आता नाना पटोले यांची जागा घेतील. पटोले यांनी अलीकडेच आपला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा उच्च कमांड कडे सादर केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पक्षाच्या राज्य संघटनेत मोठे बदल झाले आहे. 
ALSO READ: ठाण्यात २२ लाख रुपयांच्या हायब्रिड गांजा जप्त, दोघांना अटक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीने मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांना काढण्यात आले असून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे आता महाराष्ट्र काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील तर विजय वडेट्टीवार हे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून काम बघतील. 
ALSO READ: संजय राऊतांच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले- पवार कोणत्या व्यासपीठावर जातील हे राऊत ठरवणार नाही
या साठी अखिल भारतीय काँग्रेस समितीने एक अधिसूचना जारी केली असून त्यात नाना पटोले यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. तसेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि काँग्रेस विधिमंडळाचे पक्षाचे नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे या अधिसूचनेत लिहिले आहे. ही अधिसूचना काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केली आहे. 
ALSO READ: सर्वोच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा, अटींसह अंतरिम जामिनात वाढ
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस सचिव आणि पंजाबचे सह प्रभारी म्हणून काम केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रम येथे आयोजित केलेल्या देशव्यापी गांधी विचारदर्शन शिबिराचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून पक्षाने सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे .
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती