येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला

शनिवार, 19 मे 2018 (16:11 IST)
कर्नाटक विधानसभेत भाषण देताना भावुक होऊन येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा यांना सरकार टिकवण्यासाठी 110 आमदारांची पाठिंबा आवश्यकता होती. मात्र ही आमदारांची जुळवाजुळव झाली नाही.
 
येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यावर आता काँग्रेस आणि जेडीएस राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. यानंतर राज्यपालांकडून काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं जाईल. मात्र यासाठी राज्यपाल नेमका किती वेळ देतात, हे अजून स्पष्ट नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती