काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपध्यक्ष अमित शहा या दोघांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाल आहे. राहुल गांधी यांनी भाजपवर कडवट शब्दात टीका केली आहे. राहुल गांधींच्या या टीकेला भाजपध्यक्ष अमित शहा यांनी झोंबणाऱ्या शब्दात उत्तर दिलं. या दोघांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ट्विटरवर ‘खून-खराबा’ सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय.
कर्नाटकचे निकाल लागल्यानंतर पत्रकारांसमोर न आलेल्या राहुल गांधी यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी ट्विट केलं ज्यात टीका केली की ‘संख्याबळ नसतानाही भाजपचा सत्तास्थापनेचा हट्ट ही संविधानाची उडवलेली थट्टा आहे. भाजप पोकळ विजयाचा आनंद साजरा करीत आहे आणि देश लोकशाहीच्या पराभवाबद्दल शोक व्यक्त करीत आहे’
या टीकेला उत्तर देण्यासाठी अमित शहा पुढे आले असून त्यांनी एक ट्विट केलं ज्यात त्यांनी म्हटलंय की काँग्रेसने संधीसाधूपणा करीत जेडीएसशी हातमिळवणी केली तेव्हाच लोकशाहीचा खून झाला. ही युती कर्नाटकच्या भल्यासाठी नसून ही राजकीय फायद्यासाठी केलेली युती आहे, धिक्कार असो असे म्हटले.