शाळेत हजेरी देताना यस सर नव्हे तर जय हिंद

मध्य प्रदेशातील शाळेतील मुले आता हजेरी देताना यस सर किंवा यस मॅडमऐवजी जय हिंद म्हणणार आहेत. मध्य प्रदेश सरकारने हा आदेश जारी केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे'. शासनाने म्हटलं आहे.
 
मध्य प्रदेश सरकारने एक ऑक्टोबरपासून लागू करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री कुंवर विजय शाह यांनी घेतला आहे. सुरुवातीला सतना जिल्ह्यात हा आदेश लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांतील शाळांमध्येही या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णया अंतर्गत खासगी शाळा येणार किंवा नाही हे स्पष्ट केलेलं नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती