Tamil Nadu Accident तामिळनाडूतील सेलम येथे बुधवारी पहाटे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडूमधील सेलम-कोइम्बतूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला, जेव्हा एका वेगवान व्हॅनची उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. इंगुरहून पेरुनथुराईला जाणाऱ्या या व्हॅनमध्ये आठ जण असल्याची माहिती आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.