आसाममध्ये 10 महिन्यांच्या बाळाला एचएमपी विषाणूची लागण

Webdunia
शनिवार, 11 जानेवारी 2025 (15:16 IST)
HMPV News:  एचएमपी विषाणू भारतात आल्यापासून, त्याचे रुग्ण सतत वाढत आहे. आता आसाममधून एका 10 महिन्यांच्या मुलाला या विषाणूची लागण झाल्याची बातमी येत आहे. आसाममध्ये एका 10 महिन्यांच्या मुलाला HMPV संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे,  
ALSO READ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मानवी' वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार या मुलावर दिब्रुगडमधील आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे आणि आता त्याची प्रकृती स्थिर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एएमसीएचचे अधीक्षक म्हणाले की, मुलाला चार दिवसांपूर्वी सर्दीशी संबंधित लक्षणांमुळे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लाहौल येथील आयसीएमआर-आरएमआरसीकडून चाचणी निकाल मिळाल्यानंतर काल एचएमपीव्ही संसर्गाची पुष्टी झाल्याचे रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सांगितले.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

पुढील लेख