पुढील पाच दिवस हवामानाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊस आज शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर हळूहळू वाढेल. पुढील 5 दिवसांत हवामान आणखी बिघडण्याचा अंदाज आहे."
मान्सूनची शहराकडे वाटचाल
यलो अलर्ट म्हणजे लोकांना हवामानाबाबत अपडेट राहण्यास सांगितले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, नैऋत्य मोसमी पावसाने शहराच्या दिशेने आगेकूच केल्यामुळे शनिवारी पहाटे मुंबईच्या काही भागात पाऊस झाला.
24 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल
हवामान खात्याने गुरुवारी सांगितले की मान्सून 24 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, परंतु औपचारिक घोषणा अद्याप व्हायची आहे. IMD मुंबईने यापूर्वी सांगितले होते की, मान्सून रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघरच्या दिशेने पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. मान्सून 24 जूनपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.