म्हणून जैन यांनी अभियंत्याचा शर्ट पकडून कानशिलात लगावली

मंगळवार, 20 जून 2023 (21:13 IST)
भाजप आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदरमध्ये पालिका इंजिनिअरच्या कानशिलात लगवाल्यामुळे गीता जैन यांच्यावर टीका होत आहे. अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केल्यामुळे गीता जैन चांगल्याच संतापल्याचे पाहायला मिळाले. अधिकाऱ्यासमोर बोलत असताना इंजिनिअरला हसू आल्यावर जैन यांनी अभियंत्याचा शर्ट पकडून कानशिलात लगावली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
पेणकरपाडा या ठिकाणी अनधिकृत पने बांधलेल्या बांधकामावर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता शुभम पाटील व संजू सोनी हे तोडक कारवाई करण्याकरिता गेले असता त्या ठिकाणी एका खोलीचे बांधकाम अर्धे तोडून झाल्यावर आमदार गीता जैन पोहचल्या त्यांनी चक्क अनधिकृत बांधकाम तोडले म्हणून अभियंता शुभम पाटील याच्या कानशिलात लगावली. संबंधित अभियंत्याने कुटुंब राहत असलेल्या घरावर तोडक कारवाई करण्यासाठी पथक पाठवले होते, त्या पथकात तो अभियंताही सहभागी होता. त्यामुळे, संतापलेल्या आमदार गीता जैन यांनी अभियंत्याने तोडक कारवाई केली म्हणून कंत्राटी अभियंत्याला चक्क कानशिलात लगावली.
 
आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांची कॉलर धरून, शिवीगाळ करून कानशिलात लगावून आमदार जैन अभियंत्यास सरकारी नियम शिकवू लागल्या. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे, आणि तुम्ही घर तोडायचं काम करता, तुम्ही माणसं आहात की राक्षस असं म्हणत आमदार जैन यांनी संबंधित अभियांत्यावर कोणाचा आणि कशाचा राग काढला हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
पेनकरपाडा येथील परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या राहत्या घरावर तोडक कारवाईसाठी या अभियंत्यांच्या नेतृत्त्वात पथक गेले होते. त्यामुळे, पीडित कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी, आमदार जैन यांनी अभियंत्यास सरकारी नियम आणि माणुसकी शिकवत चांगलाच धडा शिकवला. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब वास्तव्यास आहे, आणि तुम्ही घर तोडायचं काम करता, तुम्ही माणसं आहात की राक्षस असं म्हणत आमदार जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली यावेळी, आमदारांचे शब्द ऐकताना अभियंता शुभम पाटील हे हसत असल्याने आमदार गीत जैन यांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या थेट कानशिलात लगावली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती