Android युजर्ससाठी Red Alert; ‘पिंक वॉट्सअ‍ॅप’ वरून फसवणूक करणार्‍या लिंक पासून दूर राहण्याचे आवाहन

बुधवार, 21 जून 2023 (08:54 IST)
सध्या सोशल मीडीयामध्ये एक स्पॅम लिंक शेअर करून Android युजर्सची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार मुंबई पोलीस नागरिकांना ‘Pink WhatsApp’ नावाच्या नवीन फसवणुकीबद्दल सतर्क करत आहेत. अ‍ॅडव्हायझरीनुसार, ‘अतिरिक्त वैशिष्ट्यांसह नवीन पिंक लूक व्हॉट्सअ‍ॅप’ च्या लिंक झपाट्याने शेअर होत आहेत.

यामध्ये एका सॉफ्टवेअरद्वारे युजर्सचा मोबाइल हॅक होऊ शकतो. “फसवणूक करणारे भाबड्या युजर्सना सायबर फसवणूक करण्यासाठी त्यांच्या सापळ्यात अडकवण्यासाठी विविध प्रकारच्या नवीन युक्त्या आणि मार्ग शोधून काढतात.

युजर्सनी अशा प्रकारच्या फसवणुकीबद्दल जागरूक, सतर्क आणि सावध राहणे आणि डिजिटल जगात सुरक्षित राहणे गरजेचे आहे,” असे आवाहनात म्हटले आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती