पीड़िता ठाणे शहरातील माझिवाडा परिसरातील रहिवासी असून आरोपी महिला सुमारे तीन वर्षांपूर्वी पीडितेला भेटली आणि तिने दावा केला की तिचे चित्रपट उद्योगतील उच्चपदस्थ लोकांशी संपर्क आहे आणि तुला मोठी अभिनेत्री बनवून देऊ. असे आश्वासन दिले. आरोपी महिला पीडितेला सिंगपुरात घेऊन गेली आणि तिने तिथे पीड़ित महिलेची ओळख एका पुरुषाशी करुन दिली. नंतर आरोपी व्यक्तिने तिला त्याच्या घरी बोलवले आणि तिला दारु पाजून तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने मुंबई आणि इतर ठिकाणी हॉटेल मध्ये नेऊन तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.