ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 (14:16 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका मृत व्यक्तीविरुद्ध कथित बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितेनुसार आरोपीने १७ वर्षीय मुलीशी मैत्री केली आणि जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान तिच्यावर अनेक वेळा लैंगिक केल्याचा आरोप आहे. आरोपीने नंतर मुलीशी लग्न केले, ती गर्भवती राहिली आणि १४ फेब्रुवारी रोजी तिने एका मुलाला जन्म दिला.