लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या

सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 (10:29 IST)
लाडक्या बहिणी आठवा हफ्ता येण्याची वाट बघत आहे. त्यापूर्वी फडणवीस सरकारने या योजनेत नवी सुधारणा केली आहे. लाभार्थी महिलांना आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान केवायसी करणे अनिवार्य केले आहे. तसेच राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ALSO READ: नागपूर रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात टळला,तेलंगणा एक्सप्रेसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवण्याऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थींनाच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने नवी सुधारणा केली आहे. लोक या योजनेला लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचे षडयंत्र म्हणत आहे. 
ALSO READ: दिल्ली चेंगराचेंगरी प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी रेल्वेमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला
या योजनेत पूर्वीच पाच लाख महिलांची पात्रता काढून टाकण्यात आली असून अद्याप 2 कोटींहून अधिक बहिणी या योजनेचा लाभ घेत आहे. राज्य सरकार कडून आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्सच्या मदतीने लाडक्या बहिणीच्या पात्रतेची तपासणी आधीच सुरु केली आहे. लाभार्थी बहिणींच्या खात्यात आठव्या हफ्ताचे पैसे पुढील 8 दिवसांत बँकेच्या खात्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती