ठाण्यातील पॉश परिसरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्याला अटक

शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 (17:45 IST)
ठाण्यातील एका रहिवासी भागात एका व्यक्तीला त्याच्या फ्लॅट मध्ये सेक्स रॅकेट चालवण्याबद्द्दल पोलिसांनी अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीच्या विरुद्द्ध अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. त्यांनतर ही कारवाई करण्यात आली. 
ALSO READ: मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात मोठा खुलासा, माजी महाव्यवस्थापकाने १२२ कोटी रुपये पळवले
आरोपी हा रॅकेट चालवण्यासाठी वर्तक नगर परिसरातील फ्लॅटचा वापर करत होता. पोलिसांना तिथल्या रहिवाशींनी तक्रार केली. एका गुप्त माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी कक्षाने 12 फेब्रुवारी रोजी परिसरात छापा टाकला आणि एका महिलेची सुटका केली.आणि आरोपीला अटक केली.
ALSO READ: कसाबला मुंबईत ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते त्याच तुरुंगात तहव्वुर राणा राहील, फडणवीसांनी दिले संकेत
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 143(1) आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या आधीही राज्यातील अनेक भागात पोलीस पथकाकडून कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: ठाण्यात नैराश्याने ग्रस्त एका व्यक्तीने केली आत्महत्या

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती