हुथी बंडखोरांनी सांगितले की, अल-रहवी हे ऑगस्ट 2024 पासून हुथींच्या नेतृत्वाखालील सरकारचे पंतप्रधान होते.एका अपार्टमेंटमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रसारित होणाऱ्या भाषणाचा कार्यक्रम पाहत असताना हा हल्ला झाला.
गाझामध्ये हमासविरुद्धच्या युद्धादरम्यान हुथी बंडखोरांनी इस्रायलवर वारंवार क्षेपणास्त्रे डागली आहेत. हुथी बंडखोरांचे म्हणणे आहे की पॅलेस्टिनींशी एकता दाखवण्यासाठी हे हल्ले केले जात आहेत. तथापि, येमेनमधून डागण्यात आलेल्या बहुतेक क्षेपणास्त्रांना इस्रायलने अडवले आणि हवेतच नष्ट केले. इस्रायली हल्ल्यांमुळे मे महिन्यात साना विमानतळ बंद करण्यात आले होते. ट्रम्प प्रशासनाने मे महिन्यात हुथींसोबत कराराची घोषणा केली. याअंतर्गत, लाल समुद्रात जहाजांवर हल्ले थांबवण्याच्या बदल्यात ते हवाई हल्ले थांबवतील.