येमेनमधील केरळमधील भारतीय परिचारिका निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. निमिषा प्रियाला तिचा व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदीच्या हत्येप्रकरणी 16 जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती. केरळचे प्रभावशाली सुन्नी मुस्लिम नेते कंठापुरम ए पी अबुबकर मुसलियार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर, येमेनमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी निमिषा हिची शिक्षा पुढे ढकलली आहे.
निमिषा प्रियावर 2017 मध्ये तिचा येमेनी व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्या व्यक्तीने निमिषा प्रियावर अत्याचार केल्याचा आणि तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्या व्यक्तीच्या ताब्यातून तिचा पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषा हिने येमेनी पुरुषाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, परंतु औषधाच्या अतिसेवनामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
यानंतर, केरळमधील रहिवासी असलेल्या 37 वर्षीय निमिषा हिला येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.या प्रकरणात तिला 2020 मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि 2023 मध्ये तिचे अंतिम अपील फेटाळण्यात आले. तिच्या फाशीची तारीख 16 जुलै 2025 निश्चित करण्यात आली. सध्या निमिषा येमेनची राजधानी साना येथील तुरुंगात आहे.
अलिकडेच, सर्वोच्च न्यायालयाने निमिषाच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरही सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयात, सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल (एजीआय) यांनी सांगितले की, भारत सरकार प्रियाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, प्रियाचा खटला हाताळणाऱ्या सरकारी वकिलासह येमेनी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे, जोपर्यंत चर्चा सुरू नाही तोपर्यंत फाशीची शिक्षा स्थगित करावी