मिळालेल्या माहितीनुसार, ते घराबाहेर फिरायला जात असताना, एका कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर ते रस्त्यावर पडले. फौजा सिंग यांना त्यांच्या कुटुंबियांनी उपचारासाठी जालंधरमधील एका खाजगी रुग्णालयात आणले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
फौजा सिंग हे पंजाबी भारतीय वंशाचे निवृत्त मॅरेथॉन धावक आहे. त्यांनी अनेक वयोगटात अनेक जागतिक विक्रम मोडले आहे. फौजा सिंग यांना जगभरात टर्बनड टॉर्नाडो, रनिंग बाबा, शीख सुपरमॅन म्हणून देखील ओळखले जाते.
फौजा सिंग कोण आहे?
फौजा यांचा जन्म पंजाबमधील जालंधर येथे झाला. ब्रिटनमध्ये स्थायिक होण्यापूर्वी ते भारतात शेतकरी म्हणून काम करायचे. इतकी वर्षे ब्रिटनमध्ये राहिल्यानंतर ते हिंदी किंवा इंग्रजीऐवजी फक्त पंजाबी बोलत असत. त्यांना इंग्रजी बोलता किंवा लिहिता येत नसल्याची खंत होती. त्यांच्या धावण्याच्या कौशल्यामुळे ओळख मिळविलेल्या फौजा सुरुवातीला चालू शकत नव्हते. त्यांनी पाच वर्षांचे झाल्यानंतर चालायला सुरुवात केली.