वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर आले असतानाच अचानक नायलॉनचा मांजा गळ्याजववळ आला, पण दुचाकीवर नियंत्रण मिळवताना त्यांचा गळा मांजाने चिरला आणि गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. जवळच ड्युटीवर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने तात्काळ गवळी यांना लगेचच जे. जे. रुग्णालयात नेले. नंतर या घटनेबाबत समजताच पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी गवळी यांना तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी व्होकार्ट रुग्णालयात हलविले. वेळ न गमावता त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रीय करण्यात आली. गळ्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना दहा टाके पडले.