घशातील संसर्ग दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करून बघा

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (09:14 IST)
बदलत्या हंग्यामात घशात संसर्ग होण्याची समस्या ही एक सामान्य बाब आहे. 
हिवाळ्याच्या काळात सर्दी मुळे घशात संसर्ग होण्याची समस्या उद्भवते. घशाच्या संसर्गाला दूर करण्यासाठी आपण देखील घरगुती उपाय करू शकता. या लेखाच्या माध्यमातून घशाच्या संसर्गाला दूर करण्याचे काही उपाय सांगत आहोत. 
हिवाळ्याच्या दिवसात थंड वस्तूंचे सेवन करणं टाळावं. हिवाळ्यात थंड वस्तूंचे सेवन केल्यानं घशात संसर्ग होऊ शकतो. 
 
* काढ्याचे सेवन करावे -
घशाच्या संसर्गाला दूर करण्यासाठी काढ्याच सेवन करावं. काढ्याच सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं. कोरोनाकाळात आपल्या प्रतिकारक शक्तीला वाढविण्यासाठी काढ्याच सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. घशाच्या संसर्गापासून सुटका मिळविण्यासाठी काढ्याच सेवन करावं.
 
* आलं खावे -
आल्याचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतं. घशाच्या संसर्गापासून सुटका मिळविण्यासाठी आल्याचं सेवन करावं. आल्याचं सेवन केल्यानं घशातील संसर्गाला दूर करू शकता. 
 
* मध आणि काळी मिरी खावं - 
घशाच्या संसर्गाला दूर करण्यासाठी अर्ध्या चमचा मधात काळीमीर पूड मिसळून घ्यावी. हे चाटण घेतल्यानं घशाच्या संसर्गापासून मुक्तता मिळते. 
 
* सफरचंदाचे व्हिनेगर वापरावं - 
घशाच्या संसर्गाला दूर करण्यासाठी आपण सफरचंदाचे व्हिनेगर देखील वापरू शकता. यासाठी आपण एक चमचा सफरचंदाच्या व्हिनेगरला गरम पाण्यात घालून द्या आणि या पाण्याने गुळण्या करा. या पाण्याने गुळण्या केल्यानं आपल्याला घशाच्या संसर्गापासून सुटका मिळेल.
 
* टीप - हा लेख निव्वळ माहिती देण्यासाठी आहे. आपण एखाद्या रोगाने ग्रस्त असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती