बदलत्या हवामानात दर दुसऱ्या दिवशी घसा खराब होत असल्यास हे उपचार करा
हिवाळ्यात जर आपला घसा खराब होतो आणि आपण औषधे घेऊन कंटाळला आहात तर या घरगुती उपचाराला अवलंबवून बघा. हे उपचार कोणतीही हानी न करता आपल्या समस्येला दूर करण्यात आपली मदत करतील
* हळद आणि मीठाच्या पाण्याचे गुळणे करा -
खराब घशा पासून आराम मिळण्यासाठी फक्त मीठाच्या पाण्याने गुळणे करण्या ऐवजी मीठासह थोडी हळद मिसळून घेतल्यानं फायदा होतो.या साठी एक लहान चमचा हळद,1/2 चमचा मीठ,250 -300 मिली पाणी उकळवून पाणी कोमट झाल्यावर त्या पाण्याने गुळणे केल्यानं फायदा मिळतो. दिवसातून किमान 3 ते 4 वेळा असं केल्यानं घशातील संक्रमणाला कमी करण्यात मदत मिळते.
* ज्येष्ठमध-
घशातील बहुतेक समस्या दूर करण्यासाठी ज्येष्ठमध एक उत्तम उपाय मानला जातो. घसा खवखवत असेल तर हे बरं करण्यासाठी 1 चमचा ज्येष्ठमध पावडर मधासह दररोज घेतल्या नंतर काही वेळाने कोमट पाण्याने गुळणे करा.
* मेथी-
आरोग्यासाठी वरदान मानली जाणारी मेथी घशासाठी खूप फायदेशीर आहे. या साठी 1 चमचा मेथीदाणे 1 कप पाण्यात उकळवून गाळून घ्या. मेथीदाण्याच्या या कोमट पाण्याला पिऊन घशाच्या समस्या आणि घसादुखी पासून आराम मिळतो.