चहाचे अनेक प्रकार आहेत. पारंपरिक किंवा ट्रॅडिशनल चहाच्या ऐवजी ग्रीन टी, यलो टी, ब्लॅक टी यांना प्राधन्य मिळू लागले आहे. आपल्या पारंपरिक चहामध्ये काही मसाले घातल्यास ते इतर चहापेक्षा अधिक फायदेशीर होऊ शकतात. मसाला चहा बनविण्यासाठी ज्या मसाल्यांची गरज असते ते आपल्या घरात सहजरीत्या उपलब्ध असतात, जसे की लवंग, वेलची, आलं, दालचिनी, तुळस आणि चहापत्ती. चहामध्ये वापरले जाणार्याव या सर्व मसाल्यांचे फायदे आहेत.
* कर्करोगाचा धोका कमी होतो - चहामधील आलं, वेलची, दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट, फायटोकेकिल्स असतात. यामध्ये कर्करोगाविरोधी वैशिष्ट्ये असतात.